भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवासी तो पुरे एकभाव गांठी । तोचि त्याचे मिठी देईल पायीं

devasi to pure ekabhav ganthi | tochi tyache mithi deil payin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवासी तो पुरे एकभाव गांठी । तोचि त्याचे मिठी देईल पायीं ॥१॥ पाहोनि राहीन कवतुक निराळा । मी मज वेगळा होऊनियां ॥ध्रु.॥ कांहीं नेघें शिरीं निमित्ताचा भार । न लगे उत्तर वेचावें चि ॥२॥ तुका म्हणे जीवें पडिलिया गांठी । मग नाहीं मिठी सुटों येत ॥३॥