भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाच्या संबंधें विश्व चि सोयरें । सूत्र ओढे दोरें एका एक

devachya sambandhen vishva chi soyaren | sutra odhe doren eka ek

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवाच्या संबंधें विश्व चि सोयरें । सूत्र ओढे दोरें एका एक ॥१॥ आहाच हें नव्हे विटायासारिखें । जीव जीवनीं देखें सामावलें ॥ध्रु.॥ आणिकांचें सुख दुःख उमटे अंतरीं । एथील इतरीं तेणें न्यायें ॥२॥ तुका म्हणे ठसावलें शुद्ध जाती । शोभा चि पुढती विशेषता ॥३॥