भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवासाठी जाणा तयासी च आटी । असेल ज्या गांठीं पुण्यराशी

devasathi jana tayasi cha ati | asel jya ganthin punyarashi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवासाठी जाणा तयासी च आटी । असेल ज्या गांठीं पुण्यराशी ॥१॥ निर्बळा पाठवी बळें वाराणसी । मेला आला त्यासी अर्ध पुण्य ॥ध्रु.॥ कथें निद्राभंग करावा भोजनीं । तया सुखा धणी पार नाहीं ॥२॥ यागीं रीण घ्यावें द्यावें सुख लाहीं । बुडतां चिंता नाहीं उभयतां ॥३॥ तुका म्हणे वर्म जाणोनि करावें । एक न घलावें एकावरी ॥४॥