झालों स्वयें कृष्ण आठव हाचित्ती । भेद भयवृत्ति उरली आहे
jhalon svayen krushna athav hachitti | bhed bhayavrutti urali ahe
झालों स्वयें कृष्ण आठव हाचित्ती । भेद भयवृत्ति उरली आहे ॥१॥ उरली आहे रूप नांव दिसे भिन्न । मी आणि हा कृष्ण आठवतो ॥२॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
jhalon svayen krushna athav hachitti | bhed bhayavrutti urali ahe
झालों स्वयें कृष्ण आठव हाचित्ती । भेद भयवृत्ति उरली आहे ॥१॥ उरली आहे रूप नांव दिसे भिन्न । मी आणि हा कृष्ण आठवतो ॥२॥
jhunjar te ek vishnudas jagin | papapunya angin natale tyan
झुंजार ते एक विष्णुदास जगीं । पापपुण्य अंगीं नातळे त्यां ॥१॥ गोविंद आसनीं गोविंद शयनीं । गोविंद त्यां मनीं बैसलासे ॥ध्रु.॥
jhela re jhela varachevari jhela | hatichen gamavi to pathin sahe tola
झेला रे झेला वरचेवरी झेला । हातिचें गमावी तो पाठीं साहे टोला ॥१॥ त्रिगुणाचा चेंडू हातें झुगारी निराळा । वरीलिया मुखें मन लावी तेथें डोळा ॥ध्रु.॥
tanvakaruni drushti lavuniyan rag | davi jhagamag dolyampudhen
टंवकारूनि दृष्टी लावुनियां रग । दावी झगमग डोळ्यांपुढें ॥१॥ म्हणती शिष्यासी लागली समाधी । लटकी चि उपाधी झकविती ॥ध्रु.॥
tak ruka chal rande kan ge keli govi | pusoniyan alen thav mhanoni deten sivi
टाक रुका चाल रांडे कां गे केली गोवी । पुसोनियां आलें ठाव म्हणोनि देतें सिवी ॥१॥ आतां येणें छंदें नाचों विनोदें । नाहीं या गोविंदें माझें मजसी केलें ॥ध्रु.॥
tal dindi hatin | vaikunthinche te sangati
टाळ दिंडी हातीं । वैकुंठींचे ते सांगाती ॥१॥ जाल तरी कोणा जा गा । करा सिदोरी ते वेगा ॥ध्रु.॥
talaghol sukh namacha gajar | ghoshen jejekar brahmanandu
टाळघोळ सुख नामाचा गजर । घोषें जेजेकार ब्रह्मानंदु॥१॥ गरुडटके दिंडी पताकांचे भार । आनंद अपार ब्रह्मादिकां॥ध्रु.॥
tila topi unch davi | jagin mi ek gosavi
टिळा टोपी उंच दावी । जगीं मी एक गोसावी ॥१॥ अवघा वरपंग सारा । पोटीं विषयांचा थारा ॥ध्रु.॥
thakilen kala marili dadi | dili kudi takoniyan
ठकिलें काळा मारिली दडी । दिली कुडी टाकोनियां ॥१॥ पांघुरलों बहु काळें । घोंगडें बळें सांडवलें ॥ध्रु.॥
thakalonsen dvarin | ubha yachak bhikari
ठाकलोंसें द्वारीं । उभा याचक भीकारी ॥१॥ मज भीक कांहीं देवा । प्रेमभातुकें पाठवा ॥ध्रु.॥
thayinchi olakhi | yeil takun taka sukhin
ठायींची ओळखी । येईल टाकुं टाका सुखीं ॥१॥ तुमचा जाईल ईमान । माझे कपाळीं पतन ॥ध्रु.॥
thav tumhampashin | jhala atan hrushikeshi
ठाव तुम्हांपाशीं । झाला आतां हृषीकेशी ॥१॥ न लगे जागावें सतत । येथें स्वभावें हे नीत ॥ध्रु.॥
thav nahin bud | gharen vasavisi kud
ठाव नाहीं बुड । घरें वसविसी कुड ॥१॥ भलते ठायीं तुझा वास । सदा एरवी उदास ॥ध्रु.॥
theva janiv gundun | yethen bhav chi praman
ठेवा जाणीव गुंडून । येथें भाव चि प्रमाण ॥१॥ एका अनुसरल्या काज । अवघें जाण पंढरिराज ॥ध्रु.॥
thevilen jatan | karuniyan nij dhan
ठेविलें जतन । करूनियां निज धन ॥१॥ जयापासाव उत्पित्त । तें हें बीज धरिलें हातीं ॥ध्रु.॥
thevuni iman rahilon charanin | mhanauni dhani krupa kari
ठेवूनि इमान राहिलों चरणीं । म्हणउनि धणी कृपा करी ॥१॥ आम्हांसी भांडार करणें जतन । आलें गेलें कोण उंच निंच ॥ध्रु.॥
thevuniyan doi | payin jhalon utarai
ठेवूनियां डोई । पायीं झालों उतराई ॥१॥ कारण तें तुह्मीं जाणां । मी तराळ नारायणा ॥ध्रु.॥
dagamagi man nirashechya gunen | hen ton narayanen santavije
डगमगी मन निराशेच्या गुणें । हें तों नारायणें सांतवीजे ॥१॥ धीर तूं गंभीर जीवन जगाचें । जळो विभागाचें आआहाचते ॥ध्रु.॥
dai ghaluniyan poren | tyanchin guren chukavilin
डाई घालुनियां पोरें । त्यांचीं गुरें चुकवीलीं ॥१॥ खेळ खेळतां फोडिल्या डोया । आपण होय निराळा ॥ध्रु.॥
doi vadhavuni kesh | bhuten aniti angas
डोई वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥१॥ तरी ते नव्हति संतजन । तेथें नाहीं आत्मखुण ॥ध्रु.॥