भजनी मालिका
← भजनांकडे परत

ठाकलोंसें द्वारीं । उभा याचक भीकारी

thakalonsen dvarin | ubha yachak bhikari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ठाकलोंसें द्वारीं । उभा याचक भीकारी ॥१॥ मज भीक कांहीं देवा । प्रेमभातुकें पाठवा ॥ध्रु.॥ याचकाचा भार । घेऊं नये येरझार ॥२॥ तुका म्हणे दान । सेवा घेतल्यावांचून ॥३॥