भजनी मालिका
← भजनांकडे परत

ठेवूनियां डोई । पायीं झालों उतराई

thevuniyan doi | payin jhalon utarai

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ठेवूनियां डोई । पायीं झालों उतराई ॥१॥ कारण तें तुह्मीं जाणां । मी तराळ नारायणा ॥ध्रु.॥ प्रसंगीं वचन । दिलें तें चि खावें अन्न ॥२॥ तुका म्हणे भार । तुम्ही जाणां थोडा फार ॥३॥