भजनी मालिका
← भजनांकडे परत

ठाव तुम्हांपाशीं । झाला आतां हृषीकेशी

thav tumhampashin | jhala atan hrushikeshi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ठाव तुम्हांपाशीं । झाला आतां हृषीकेशी ॥१॥ न लगे जागावें सतत । येथें स्वभावें हे नीत ॥ध्रु.॥ चोरट्यासी थारा । येथें कैंचा जी दातारा ॥२॥ तुका म्हणे मनें । आम्हां झालें समाधान ॥३॥