भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीर्तनाच्या सुखें सुखी होय देव । पंढरीचा राव संगीं आहे

kirtanachya sukhen sukhi hoy dev | pandharicha rav sangin ahe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कीर्तनाच्या सुखें सुखी होय देव । पंढरीचा राव संगीं आहे ॥१॥ भक्त जाय सदा हरी कीर्ति गात । त्यासेवें अनंत हिंडतसे ॥ध्रु.॥ त्रैलोक्य भ्रमण करित नारद । त्यासंवे गोविंद फिरतसे ॥२॥ नारद मंजुळ सुस्वरें गीत गात । मार्गा चालताहे संगें हरी ॥३॥ तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची । नाहीं आणिकांची प्रीति ऐसी ॥४॥