भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुरुवंडी करीन काया । वरोनि पायां गोजिरिया

kuruvandi karin kaya | varoni payan gojiriya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कुरुवंडी करीन काया । वरोनि पायां गोजिरिया ॥१॥ बैसलें तें रूप डोळां । मन चाळा लागलें ॥ध्रु.॥ परतें न सरवे दुरि । आवडी पुरी बैसली ॥२॥ तुका म्हणे विसावलों । येथें धालों धणीवरी ॥३॥