भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपाळु भक्तांचा । ऐसा पति गोपिकांचा

krupalu bhaktancha | aisa pati gopikancha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कृपाळु भक्तांचा । ऐसा पति गोपिकांचा ॥१॥ उभा न पाचारितां दारीं । न संगतां काम करी ॥ध्रु.॥ भाव देखोनि निर्मळ । रजां वोडवी कपाळ ॥२॥ तुकयाबंधु म्हणे न भजा । कां रे ऐसा भोळा राजा ॥३॥