भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

लाघवी सूत्रधारी दोरी नाचवी कुसरी । उपजवी पाळूनि संहारी नानापरिचीं लाघवें ॥१॥ पुरोनि पंढरिये उरलें भक्तीसुखें लांचावलें । उभें चि राहिलें कर कटीं न बैसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लाज वाटे पुढें तोंड दाखवितां । परि जाऊं आतां कोणापाशी ॥१॥ चुकलिया कामा मागतों मुशारा । लाज फजितखोरा नाहीं मज ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लाज वाटे मज मानिती हे लोक । हें तों नाहीं एक माझे अंगी ॥१॥ मोजुनि झिजलों मापाचिया परी । जाळावी हे थोरी लाभाविण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लाजोनियां काळें राहिलें लिखित । नेदितां ही चित्त समाधान ॥१॥ कैसें सुख वाटे वचनाचे तुटी । प्रीतिविण भेटी रुचि नेदी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लाडाच्या उत्तरीं वाढविती कलहे । हा तो अमंगळ जातिगुण ॥१॥ तमाचे शरीरीं विटाळ चि वसे । विचाराचा नसे लेश तो ही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लापनिकशब्दें नातुडे हा देव । मनिंचे गुह्य भाव शुद्ध बोला ॥१॥ अंतरिंचा भेद जाणे परमानंद । जयासी संवाद करणें लागे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लांब लांब जटा काय वाढवूनि । पावडें घेऊनि क्रोधें चाले ॥१॥ खायाचा वोळसा शिव्या दे जनाला । ऐशा तापशाला बोध कैंचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लांबवूनि जटा नेसोनि कासोटा । अभिमान मोटा करिताती ॥१॥ सर्वांगा करिती विभूतिलेपन । पाहाती मिष्टान्न भक्षावया ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

लाभ जाला बहुतां दिसीं । लाहो करा पुढें नासी । मनुष्यदेहा ऐसी । उत्तमजोडी जोडिली ॥१॥ घेई हरीनाम सादरें । भरा सुखाचीं भांडारें । जालिया व्यापारें । लाहो हेवा जोडीचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लाल कंबली वोढे पेनाये । मोसु हरीथें कैसें बनाये ॥१॥ कहे सखि तुम्हें करति सोर । हिरदा हरीका कठिन कठोर ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

लावूनियां गोठी । चुकवूं आदरिली दिठी । देऊनियां मिठी । पळे महिया माथुले ॥१॥ पुढे तेची करी आड । तिचा लोभ तिसी नाड । उरवी चरफड । हात गोउनी पळावें ॥ध्रु॥

रचनाकार: संत तुकाराम