भजनी मालिका
← भजनांकडे परत

राजा जाय तिकडे ऐश्वर्य संपत्ती । वैभवें चालती समागमें

raja jay tikade aishvarya sampatti | vaibhaven chalati samagamen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
राजा जाय तिकडे ऐश्वर्य संपत्ती । वैभवें चालती समागमें ॥१॥ वसे वनामाजी तेथें सर्व सिध्दी । घेऊनि समृध्दी वसतीपाशीं ॥२॥ नाहीं उणें धनावस्त्रा आणि भूषणा । अन्ना काष्ठा जीवना तृणा सैन्या ॥३॥ निळा म्हणे देवा तुम्ही लक्ष्मीवर । उभे कटीं कर जयापाशीं ॥४॥