भजनी मालिका
← भजनांकडे परत

येती जाती वर्षती मेघ । गगन तें अभंग जैसें तैसें

yeti jati varshati megh | gagan ten abhang jaisen taisen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
येती जाती वर्षती मेघ । गगन तें अभंग जैसें तैसें ॥१॥ तैसींच ब्रम्हांडे अनेक होती जाती । स्वरुप तें अव्दैतीं अव्दैत ॥२॥ नाना नटिया नटवेष । परि तो आपणास भिन्न नव्हे ॥३॥ निळा म्हणे नानावस्त्राकार तंतु । दाउनी आपणांतु आपण ॥४॥