भजनी मालिका
← भजनांकडे परत

येईल चित्तासी तें करा । तुम्ही आतां विश्वंभरा

yeil chittasi ten kara | tumhi atan vishvambhara

रचनाकार: संत निळोबा · अभंग
येईल चित्तासी तें करा । तुम्ही आतां विश्वंभरा ॥१॥ आमुचें वायां गेलें जिणें । नांदा तुम्ही देवपणें ॥२॥ केली आम्ही तोंडपिटी । फजिती व्हावया शेवटीं ॥३॥ निळा म्हणे निजाभिमान । तुम्हीं सांडिला इमान ॥४॥