भजनी मालिका
← भजनांकडे परत

येऊनियां कृपावंतें । तुकयास्वामी सुदुरुनाथें

yeuniyan krupavanten | tukayasvami sudurunathen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
येऊनियां कृपावंतें । तुकयास्वामी सुदुरुनाथें ॥१॥ हात ठेविला मस्तकीं । देउनी प्रसाद केलें सुखी ॥२॥ माझी वाढविली मती । गुण वर्णावया स्फूर्ती ॥३॥ निळा म्हणे मी बोलता । दिसे परी हे त्याची सत्ता ॥४॥