भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरवें झालें बरवें झालें । आत्मराम ह्रदयीं आले

baraven jhalen baraven jhalen | atmaram hradayin ale

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बरवें झालें बरवें झालें । आत्मराम ह्रदयीं आले ॥१॥ सद्गुरुनीं कृपा केली । वस्तु डोळां पैं दाविली ॥२॥ आनंदीं आनंद । पाहे तिकडे हा गोविंद ॥३॥ निळा म्हणे मी निष्काम । परिपूर्ण आत्माराम ॥४॥