भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुत भाग्यें भूमंडळा । आले सकळां उध्दराया

bahut bhagyen bhumandala | ale sakalan udhdaraya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बहुत भाग्यें भूमंडळा । आले सकळां उध्दराया ॥१॥ वर्तोनियां दाविती लोकां । पाविती परिपाका आणिकांही ॥२॥ सहज त्यांचा क्रीडा खेळ । हाचि मंगळ सुखकर्ता ॥३॥ निळा म्हणे हें महीतळ । ज्याचिया अढळ धर्मक्रिया ॥४॥