भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरें जाणवलें मग । करी येऊनियां लगबग

baren janavalen mag | kari yeuniyan lagabag

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बरें जाणवलें मग । करी येऊनियां लगबग ॥१॥ अवलोकुनी कृपादृष्टीं । धरी कवळूनियां पोटीं ॥२॥ वोरसली माहें । लावी स्तनीं पाजी पेहे ॥३॥ निळा म्हणे दुरी । नवजे बैसोनियां घरीं ॥४॥