भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम मंत्राचिया आवर्ती । घडती जयासी पुढतोपुढती

ram mantrachiya avarti | ghadati jayasi pudhatopudhati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
राम मंत्राचिया आवर्ती । घडती जयासी पुढतोपुढती । त्याचा जन्म धन्य ये क्षितीं । सर्व कुळाशीं तारक ॥१॥ राममंत्र आवडे जीवा । हाचि उद्धार सर्व जीवां । शिवासही विसावा । पार्वती सहित ॥२॥ रामकृष्ण उच्चारे । तरती जड पामरें । ऐसें हें व्यासें निर्धारेम । नानाग्रंथीं सांगितलें ॥३॥ नामा जपे नाम मंत्र । आणिक नेणे नाना शास्त्र । रामनामें नित्य वक्त्र । हरी रंगें रंगलें ॥४॥