भजनी मालिका
← भजनांकडे परत

राधा वनींच्या पुत्रास धन बहुत झालें । तो म्हणे आतां धर्म करीन । बापाचिया श्राद्धा आवंतिले ब्राम्हण । एक जेवण सदामाचें

radha vaninchya putras dhan bahut jhalen | to mhane atan dharma karin | bapachiya shraddha avantile bramhan | ek jevan sadamachen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
राधा वनींच्या पुत्रास धन बहुत झालें । तो म्हणे आतां धर्म करीन । बापाचिया श्राद्धा आवंतिले ब्राम्हण । एक जेवण सदामाचें ॥१॥ कैसी नागवण आलीरे बापा । वेंचा परतें पाप आणिक नाहीं ॥ध्रु०॥ सहाजणां ब्राह्मणां सहा सवा शेराचा भात । कढींत हिंग जिरें मिरें बहुत । त्यावरी घातलें मुगाचें वरण । येवोका मरण जिवित्यांसी ॥२॥ सहाजणां ब्राम्हणां घातले सहा वडे । घालितां रडे उकसाबुकसीं । त्यावरी घातलें तूप लोणकदॆं । जावो कां मढें या जेवित्यांचें ॥३॥ सगळ्या गव्हाची रांधिली क्षीरी । ही एक महामारी आली देखा । त्यावरी घातला साखर गुळ । उठोका पोटशूळ जेवित्यांसी ॥४॥ जेवण झालें दहीभात आला । तंव आत्मा लागला ब्रम्हांडासी । बहुतेक दिवसासी अंतर पडिला । समुळीं नागविला म्हणे नामा ॥५॥