भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

अविट बोलणें बोलावें अनादि । जें गुह्म वेदीं सांपडेना ॥१॥ कीर्ति पैं वैराग्य केलें सामराज्य । गुरुत्वासी लाज नाहीं आली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अव्यक्त परब्रह्मा कैसें आलें वो व्यक्तीं । अकळु न कळेचि तो हा अमुर्त मूर्ती । पुंडलिकाचे भक्ती य़ेऊनियां वाळवंटीं । उभा राहे विटेवरी कर ठेऊनि कटीं ॥१॥ जिवाचा जिवनु वो मज भेटवा हरी । लागलें प्रेम पिसें होऊनि दासी कामारी ॥ध्रु०॥

रचनाकार: संत नामदेव

अष्टोत्तरशें तीर्थें सारीं । ओघें आलीं आळंकापुरीं । वाद्यें वाजताती गजरीं । कीर्तन लहरी अमृताची ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

अष्टोत्तरशें वेळ समाधि निश्चळ । पूर्वीं तुझें स्थळ वहनाखालीं ॥१॥ उठविला नंदी शिवाचा ढवळा । उघडिली शिळा विवराची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

असतां सुखरुप मातापिता वृद्ध । वैकुंठा स्वानंदे निघोनी गेलीं ॥१॥ संसाराची चिंता नाहीं विठठलासी । अखंड वृत्तीसी समाधान ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

असत्याचें मूळ बैसलें ये वाचे । तें न फिटती साचे तीर्थोदकें ॥१॥ हरीनामामृत प्रक्षाळी जिव्हेतें । पाणिये बहुतें काय करिती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

असोनि न दिसे लौकिक वेव्हरीं । ऐसा तूं अंतरीं लपवीं मज ॥१॥ परि तुझे पायीं माझें अनुसंधान । वरी प्रेमाजीवन देई देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अहंकार पोटींचे उतरिले जहर । केला उपकार जगामाजीं ॥१॥ कामक्रोध उतें उतरिले दंभ । करपले कोंभ संशयाचे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अहंकारें आथिलें ऐसें जें शरीर । तें जाणा मंदिर चांडाळाचें ॥१॥ आपुलिया मुखें सांगे पंढरिनाथ । नव्हेचि तो भक्त सत्य जाणा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अहर्निशीं कंस बसे चिंताक्रांत । विचार पुसत प्रधा-नासी ॥१॥ प्रतिज्ञा करूनि शत्रुवधा जाती । ते मागें न येती पर-तोनी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका । नाहीं भय शंका लौकिकाची ॥१॥ लावोनि लंगोटी जालेती गोसावी । आमुची उठाठेवी कोण करी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आई मज ह्मणसील अवगुणांचें । तरी मी काय करितों कोणाचें । जें जें होणार जयाचें । तें कां मजवरी घालिसी ॥१॥ भट आलासे माभळ । तेणें वर्णिल जन्मकाळ । तो चुकला ग्रहमूळ । तेणें त्यासी पाडिलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव