भजनी मालिका
← भजनांकडे परत

आई मेली बाप मेला । मज सांभाळीं विठ्ठला

ai meli bap mela | maj sambhalin viththala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आई मेली बाप मेला । मज सांभाळीं विठ्ठला ॥१॥ हरीरे मज कोणी नाहीं । माझी खात असे डोई ॥२॥ विठ्ठल म्हणे रुक्मिणी । माझे जनीला नाहीं कोणी ॥३॥ हातीं घेउनी तेलफणी । केंस विंचरून घाली वेणी ॥४॥ वेणी घालुन दिधली गांठ । जनी म्हणे चोळ बा पाठ ॥५॥ जनी म्हणे बा गोपाळा । करी दुबळीचा सोहळा ॥६॥