भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहंकारें आथिलें ऐसें जें शरीर । तें जाणा मंदिर चांडाळाचें

ahankaren athilen aisen jen sharir | ten jana mandir chandalachen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अहंकारें आथिलें ऐसें जें शरीर । तें जाणा मंदिर चांडाळाचें ॥१॥ आपुलिया मुखें सांगे पंढरिनाथ । नव्हेचि तो भक्त सत्य जाणा ॥२॥ नाम विठंविती संतांचि हांसती । ते मूर्ख ह्मणि-जेती सर्पपिलीं ॥३॥ तयांसि लक्ष्मीवल्लभ सांगे उपदेश । नामा विष्णुदास विनवीतसे ॥४॥