भजनी मालिका
← भजनांकडे परत

खेळ मांडियला गोल्हात शिखरीं । अर्थ चंद्रावरी शेखी याचा

khel mandiyala golhat shikharin | artha chandravari shekhi yacha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
खेळ मांडियला गोल्हात शिखरीं । अर्थ चंद्रावरी शेखी याचा ॥१॥ चोवीस त्या गुंफा रुद्रलिंगीं नांदे । अभेद तो वेद बोले तेथें ॥२॥ तीही अक्षरांच्या वाटेच्या सेजारीं । सोळा चंद्र नारी भेदाभेद ॥३॥ सूर्य एकवीस शोभती चहूंकडे । खेळती उघडे संत तेथें ॥४॥