भजनी मालिका
← भजनांकडे परत

खांद्यावरी पांवा कस्तुरीचा टिळा । चालत गोपाळ गाईमागें

khandyavari panva kasturicha tila | chalat gopal gaimagen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
खांद्यावरी पांवा कस्तुरीचा टिळा । चालत गोपाळ गाईमागें ॥१॥ यमुने पाबळीं गोपां पाचारीत । सिदोर्‍या शोभत पाठीवरी ॥२॥ अंतीं पंक्ति करी त्या गोपाळांच्या । संगें गोविंद त्यांच्या अखंडित ॥३॥ नामा म्हणे बोनें विटों देऊं नका । वैकुंठ-नायका सांभाळावें ॥४॥