भजनी मालिका
← भजनांकडे परत

गगनीं ध्रुव तुवां अढळ पैं केला । तो बाळ धाकुला न ह्मणसी

gaganin dhruv tuvan adhal pain kela | to bal dhakula na hmanasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गगनीं ध्रुव तुवां अढळ पैं केला । तो बाळ धाकुला न ह्मणसी ॥१॥ अजामेळाचें तुवां चुकविलें संकट । ब्राह्मण तो नष्ट न ह्मणसी ॥२॥ प्रर्‍हादाचा तुवां केला कैवारु । वैर्‍याचा कुमरु न म्हणसी ॥३॥ गजेमद्रपशू सोडविला पानडिये । मृगखोडी ऐसिये न ह्मणसी ॥४॥ रुक्मांगदाची तुवं उद्धरिली नगरी । विषयीं मुरारी न ह्मणसी तया ॥५॥ ऐसे अपराधी न ह्मणसी देवा । नामा तो केशवा विनवीतसे ॥६॥