भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्षणक्षणां देहीं आयुष्य हें काटे । वासना हे वाटे नित्य नवी

kshanakshanan dehin ayushya hen kate | vasana he vate nitya navi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
क्षणक्षणां देहीं आयुष्य हें काटे । वासना हे वाटे नित्य नवी ॥१॥ माझें मी ह्मणतो गेले नेणों किती । र्मक चक्रवर्ति असं-ख्यात ॥२॥ देह जाय तोंवरी अभिमान । न करीं अज्ञान आत्म-हित ॥३॥ मोहाचीं सोयरीं मिळोनि चोरटीं । खाऊनि करंटीं घेती घर ॥४॥ जोंवरी संपत्ति तोंवरी हा निके । धनासवें भुंके तयांमागें ॥५॥ नामा ह्मणे झालों केशवाचा दास । दाखवी वोरस तुझ्या नामीं ॥६॥