भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

एकचि हें तत्व एकाकार देशीं । एक तो ने-मेसी सर्व जनीं ॥१॥ ऐसें ब्रह्म पाहा आहे सर्व एक । न-लगे तो विवेक करणें कांहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एकटी येकला सर्व हें सकळां । आपणची जाला विश्वहरी ॥१॥ न कळे याची माव कैसा आहे भाव । सर्वांभूतीं देव गीता सांगे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एकतत्त्व हरी निर्धार तूं धरी । प्रपंच बोहरी एका नामें ॥१॥ अच्युत गोविंद परमानंद छंद । नित्य तो आल्हाद हरिनामीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एकदां श्रीकृष्ण खेळत असतां । प्रवेशे अवचिता गोपीगृहीं ॥१॥ दोहीं करीं तेव्हां नेत्र चोळीतसे । गोपी पुसते काय झालें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एकमेळीं जेविती वैष्णव सकळ । वाढिती गोपाळ सकळांसी ॥१॥ पांडुरंगें केला चांगोबाचा सोहळा । माळ घाली गळां पुंडलिक ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एका ब्राम्हणाचें घरीं खाण पडिलें । सातां चोरीं एक मुसळ नेलें । बापुडें ब्राम्हण नागविलें । धाऊनि आलें वोसगांवींचें ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

एकाएकीं दैव उदेलें ध्रुवाचें । येणें नारदाचें झालें तेथें ॥१॥ देखियेलें पोर टाकलेंसे वनीं । भावना धरोनी अपसया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एकांत एकला सर्व आहे हरी । ऐसेंचि अहर्निशीं ध्यायिजे तूं ॥१॥ सर्वांभूतीं विठठल आहे आहे साचे । हें तंव वेदींचे वचन जाण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एकादशी दिनीं खाईल जो अन्न । सूकर होऊनि येईल जन्मा ॥१॥ एकादशी दिनीं करील जो भोग । त्यासी माता संग घडतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एकी एकादशी करितां काय वेंचे । उपवासी राहतां काय वेंचे ॥१॥ एक तुळसीदळ वाहतां काय वेंचे । पाउलीं वंदितां काय वेंचे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एके दिनीं भार्या भावें तें मानवी । भ्रतारा विनवी नम्रतेनें ॥१॥ तुमचा सोइरा आहे नारायण । अखंडित ध्यान करितां त्याचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एके दिनीं रत्नसिंहासनावरी । कैसा त्रिपुरारी शोभ-तसे ॥१॥ सांगों जातां चार्‍ही वाचा विसांवती । तेथें माझी मति काय सांगों ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एके हातीं टाळ एके हातीं दिंडी । ह्मणे वाचा उदंडीं रामनाम ॥१॥ श्रीहरीसारिखा गोसांवी पैं चांगु । फेडिला पैं पांगु जन्मांतरींचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एकेकाळीं मोठा आनंद पैं झाला । नभीं उगवला पूर्ण चंद्र ॥१॥ तेव्हां गोप आले विनविती गोपाळा । आतां जाऊं चला चोरीलागीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव