भजनी मालिका
← भजनांकडे परत

एके दिवशीं वाडियांत । देव आले अवचित

eke divashin vadiyant | dev ale avachit

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एके दिवशीं वाडियांत । देव आले अवचित ॥१॥ अवघीं पायांस लागली । देवें त्यांवरी कृपा केली ॥२॥ बाहेर कामासी गुंतल्यें । देवें मजला विचारिलें ॥३॥ बाहेर आहेस वो बोलती । देव मजला हाटकिती ॥४॥ हात धुऊनि जवळ गेल्यें । कोण गे जनी हांसून बोले ॥५॥