भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकाएकीं दैव उदेलें ध्रुवाचें । येणें नारदाचें झालें तेथें

ekaekin daiv udelen dhruvachen | yenen naradachen jhalen tethen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एकाएकीं दैव उदेलें ध्रुवाचें । येणें नारदाचें झालें तेथें ॥१॥ देखियेलें पोर टाकलेंसे वनीं । भावना धरोनी अपसया ॥२॥ साधूचा भाव उदकाचिया परी । लव तेथें भरी उणें नाहीं ॥३॥ आर्तींचा हे आर्त पुरवावा हा नेम । साधूचा नि:सीम स्वभाव कीं ॥४॥ गिरी देखे मेघ मग तो कैसा थोर । तैसे ते उदार साधुसंत ॥५॥ आतां या बाळाचा योग क्षेम कैसा । पुसावया धिंवसा नामा म्हणे ॥६॥