भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकेकाळीं मोठा आनंद पैं झाला । नभीं उगवला पूर्ण चंद्र

ekekalin motha anand pain jhala | nabhin ugavala purna chandra

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एकेकाळीं मोठा आनंद पैं झाला । नभीं उगवला पूर्ण चंद्र ॥१॥ तेव्हां गोप आले विनविती गोपाळा । आतां जाऊं चला चोरीलागीं ॥२॥ कोठें काय असे तें आम्हां ठाउकें । जाऊं एकमेकें मिळोनियां ॥३॥ तुझिये संगती वाढतो आनंद । दाविसी विनोद ब्रह्मांदिका ॥४॥ नामा ह्मणे ऐसें गोपाळ बोलिले । ऐको-नियां झालें देवा गोड ॥५॥