भजनी मालिका
← भजनांकडे परत

एके ठायीं करुनी अन्न । हातें वाढी नारायण

eke thayin karuni anna | haten vadhi narayan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एके ठायीं करुनी अन्न । हातें वाढी नारायण ॥१॥ हें पाहोनी सुरवर । चित्तीं करिती विचार ॥२॥ धन्य पुण्य गौळीयांचें । आम्हां अन्न मिळे कैचें ॥३॥ एक असे युक्ति । हात धुवील श्रीपति ॥४॥ उच्छिष्टाचे मिषें । देव जळीं झाले मासे ॥५॥ हें कळलें घन-नीळा । सांगतसे हें गोपाळ ॥६॥ चला वृंदावना जाऊं । नामा ह्मणे उदक घेऊं ॥७॥