भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकादशी दिनीं खाईल जो अन्न । सूकर होऊनि येईल जन्मा

ekadashi dinin khail jo anna | sukar houni yeil janma

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एकादशी दिनीं खाईल जो अन्न । सूकर होऊनि येईल जन्मा ॥१॥ एकादशी दिनीं करील जो भोग । त्यासी माता संग घडतसे ॥२॥ एकादशी दिनीं खेळेळ सोंगटी । काळ हाणील खुंटी गुदस्थानीं ॥३॥ रजस्त्री शोणीत सेविल्या समान । तांबुल चर्वण करील जो ॥४॥ नामा ह्मणे नाहीं माझ्याकडे दोष । पुराणीं हें व्यासवाक्य आहे ॥५॥