भजनी मालिका

संत जनाबाई

या संतांची भजने

संतमहानुभाव येती दिगंबर नम्रतेचे घर विरळा जायें ||१|| निवाले मीपण ते जे ठायीं नाहीं सोहं शब्द सोई तेथें कैंची ||२||

रचनाकार: संत जनाबाई

संतांचा तो संग नव्हे भलतेसा पालटावी दशा तात्काळिक ॥१॥ चंदनाचे संगें पालटती झाडें। दुर्बलांकडे देवमाथां ||२॥

रचनाकार: संत जनाबाई

सत्त्वरजतमें असे हैं बांधिलें। शरीर दृढ झाले अहंकारें ।।१।। सांडीं अहंकार धरीं दृढभाव हृदयीं पंढरिराय धरोनियां ।।२।।

रचनाकार: संत जनाबाई

संसारी निधान लाधले जनां सद्गुरुचरणा सेवीं बापा ॥१॥ कायावाचामनें तयास देवावीं । वस्तु मागून घ्यावी अगोचर ॥ २॥

रचनाकार: संत जनाबाई

सांवळी ते मूर्ति हृदयीं बिंबली । देहो बुद्धि पालटली माझी साची ॥१॥ धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव। हृदयीं पंढरिराव राहतसे ।। २।।

रचनाकार: संत जनाबाई

सुंदर माझें जातें गे फिरे बहुतेक ओव्या गाऊं कौतुके तूं मेरे बा विठ्ठला ।।१।। जीवशिव दोनी खुंटे गे प्रपंचाचे नेटें गे। लावुनी पांचीं बोटें गे तूं येरे बा विठ्ठला ।। २ ।।

रचनाकार: संत जनाबाई

सुंबाचा करदोडा रकट्याची लंगोटी नामा वाळवंटी कथा करी।।१।। ब्रह्मादिक देव येवोनि पाहाती। आनंदें गर्जती जयजयकार ।।२।।

रचनाकार: संत जनाबाई

सोपानाची ऐशी मूर्ति । विश्वकर्ता ब्रम्ह म्हणती ॥१॥ ऐसें बोले पुराणांत । सृष्‍टिकर्ता जो भगवंत ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई