भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतभार पंढरीत कीर्तनाचा गजर होत

santabhar pandharit kirtanacha gajar hot

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
संतभार पंढरीत कीर्तनाचा गजर होत॥१॥ तेथे असे देव उभा । जैशी समचरणांची शोभा ॥२॥ रंग भरे कीर्तनांत प्रेमें हरिदास नाचत ॥३॥ सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाचें जो जिव्हार ||४|| ऐशा संतांशरण जावें। जनी म्हणे त्याला घ्यावें ॥५॥