भजनी मालिका
← भजनांकडे परत

साळी सडायास काढी । पुढे जाउनी उखळ झाडी

sali sadayas kadhi | pudhe jauni ukhal jhadi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
साळी सडायास काढी । पुढे जाउनी उखळ झाडी ।।१।। कांडितां कांडितां । शीण आला पंढरिनाथा ।।२।। सर्व अंगीं घाम आला । तेणें पितांबर भिजला ॥३॥ पायीं पैंजण हातीं कड़ीं। कोंडा पांखडुनि काढी।।४।। हाता आला असे फोड। जनी म्हणे मुसळ सोड ॥५॥