भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

अवघेंचि त्रैलोक्य आनंदाचे आतां । चरणीं जगन्नाथा चित्त ठेलें ॥१॥ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथांचा नाथ जनार्दन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अवघेंची सुख तयासी जोडलें । अवघे पाउलें देखतांची ॥१॥ अवघें ब्रह्मारुप नाहीं कांहीं चिंता । अवघाचि देखतां पांडुरंग ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अवघ्या संसाराचा कळस जाला । आमुलाची कैसा पोट आला ॥१॥ पाठीं बैसला तोचि पोटी । उघड्या दिठीं देखतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अवचट दैवयोगें नाम येत मुखा । त्रैलोक्याचा सखा प्राण होय ॥१॥ आवडी आदरें उच्चारी जो नाम । वैकुंठ निजधाम तया सुख ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अवतरला श्रीराम परब्रह्मा पुतळा । सुहास्य मुख सुंदर कांसे पितांबर पिवळा ॥१॥ दशरथनंदन रामपाहतां वो मनी ध्यातां । देहबुद्धी हरपली डोळें भरी पहातां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अवरोध विरोध करितां हरिभक्ति । सायुज्यता मुक्ति देणें तया ॥१॥ ऐसा कृपाळू लक्ष्मीच्या पती । पुराणें वर्णिती महिमा ज्याचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अविद्या निशींचा लोटला पहार । रजेंसी लोपला तम अंधकार । सत्व शोधित शुद्ध सुमनहार । प्रबोध पाहतां परतला कृष्ण वीरवो ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ