भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवतार शिवाचा । निवृत्ति साचा जप करा

avatar shivacha | nivrutti sacha jap kara

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अवतार शिवाचा । निवृत्ति साचा जप करा ॥१॥ श्रीविष्णूचा अवतार । स्वामी माझा ज्ञानेश्वर ॥२॥ सोपानदेव तो निर्धार । ब्रह्मयाचा अवतार ॥३॥ मुक्ताईचे चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥