भजनी मालिका
← भजनांकडे परत

उघड दाखविलें देवा । नाहीं सेवा घेतली

ughad dakhavilen deva | nahin seva ghetali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उघड दाखविलें देवा । नाहीं सेवा घेतली ॥१॥ ऐसी प्रेमाची माउली । जगीं व्यापक व्यापली ॥२॥ नाहीं घालीत भार कांहीं । आठव देहीं रामकृष्ण ॥३॥ एका जनार्दनीं शरण । मन माझें नेलें चोरुन ॥४॥