भजनी मालिका
← भजनांकडे परत

उगवला दिन दूत ते धांवती । सांगती रायाप्रती धरिले चोरी

ugavala din dut te dhanvati | sangati rayaprati dharile chori

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उगवला दिन दूत ते धांवती । सांगती रायाप्रती धरिले चोरी ॥१॥ उगवले कोटी भानुप्रभा तेवीं दिसे । येऊनियां पुसे राजा तेथें ॥२॥ इंद्रें पाठविले न्यावया सुमनें । तुम्ही पुण्यवंत जाण म्हणोनियां ॥३॥ धन्य ग्राम पुण्यवंत भूमी जन । आम्हांलागी विघ्न कां हें आलें ॥४॥ राहावया तुम्हां कोणतें कारण । लागला धूम्र जाण वृंतारकाचा ॥५॥ एका जनार्दनीं यासी उपाय । पतिव्रता होय एकादशी व्रतीं ॥६॥