भजनी मालिका
← भजनांकडे परत

उघडा विठ्ठल विटेवरी उभा । अनुपम्य शोभा दिसतसे

ughada viththal vitevari ubha | anupamya shobha disatase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उघडा विठ्ठल विटेवरी उभा । अनुपम्य शोभा दिसतसे ॥१॥ विटेवरी पाय जोडियले सम । तेंचि माझे धाम ह्रुदयीं राहो ॥२॥ एका जनार्दनीं विठ्ठल सांवळा । देखियेला डोळां विटेवरी ॥३॥