भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

व्रत जे करिती तया जे निंदिती । त्याचे पूर्वज जाती नरकामधीं ॥१॥ भाळे भोळे भक्त वेडें वांकुडें गाती । तया जे हासती ते श्वानसम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

व्रतामाजीं व्रत एकादशी पावन । दिंडी जागरण देवा प्रिय ॥१॥ अष्टही प्रहर हरिकथा करी । वाचें विठ्ठल हरी वदोनियां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शंख चक्र पद्म विराजत करी । बाप तो श्रीहरीं उभा वटी ॥१॥ रुक्मिणी सत्यभामा शोबतसे राही । गरुड हनुमंत दोघे दों ठायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शत वरुषांची घेउनी आला चिठ्ठी । अर्ध रात्रीं खादलें उठाउठीं ॥१॥ केव्हां जपसील रामनाम वाचें । आयुष्य सरलीया पडतील यमफांसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शतावती श्रवण अधिक पैं जालें । तेणें अंगा आलें जाणणेपण ॥१॥ पुराण श्रवण लौकिक प्रतिष्ठा । विचार चोहटा जाणिवेचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शम दम तप शौच आणि क्षमा । आर्जव तो प्रेमा ज्ञानालागीं ॥१॥ आत्मा अनुभव वेदीं सत्य भाव । ब्राह्मण स्वभाव कर्म ऐसें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शरणागत आलिया नुपेक्षी सर्वथा । ऐसा बोध चित्ता आहे माझ्या ॥१॥ सर्व भावें जावें नाम वाचे गावें । जिवलगा भेटावें विठोबासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शरणागता कृपाळु उदार पंढरीराणा । जाणतसे खुणा अंतरीच्या ॥१॥ तिहीं त्रिभुवनी चाले एक सत्ता । म्हणोनि तत्त्वतां कींव भाकी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शरणागता नुपेक्षी हरी । ऐसी चराचरीं कीर्ति ज्याची ॥१॥ बिभीषणें नमस्कार केला । राज्यदह्र केला श्रीरामें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शहाणा तो जाण रे । उद्धवा आत्मत्वें पाहें रे । नेणता तो जाण रे । उद्धवा देहबुद्धीस वाहे रे ॥१॥ उद्धव म्हणे कान्होबा सांग रे । गोडा गोडा गोष्टी स्वभाव रे । निज गोडा गोष्टी ऐकतां । चित्त चैतन्य फांवे रे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शहाणा हो म्हणविती । हरिभक्ति कां रे वरवर करिती ॥१॥ उगीच कासया करसील फड । जग हें बोधावया बापुडें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शाकार भारे मस्तकीं वाहिले । घर शाकारिलें नामयाचें ॥१॥ दामशेटी पुसे कोठील तूं कोण । येरु म्हणे जाण वस्ती येथें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ