भजनी मालिका
← भजनांकडे परत

शरण शरण नारायणा । आम्हां दीना तारावें

sharan sharan narayana | amhan dina taraven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शरण शरण नारायणा । आम्हां दीना तारावें ॥१॥ मागें बहु शीण पोटीं । पाडा तुटी तयाची ॥२॥ संसाराचा चुकवा हेवा । मागील उगवा गुंती ते ॥३॥ तुम्हीं कृपा केल्यावरी । मी निर्धारी पात्राची ॥४॥ शरण एका जनार्दनीं । तुम्हीं तो धनी त्रैलोक्याचे ॥५॥