भजनी मालिका
← भजनांकडे परत

शरणागता कृपाळु उदार पंढरीराणा । जाणतसे खुणा अंतरीच्या

sharanagata krupalu udar pandharirana | janatase khuna antarichya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शरणागता कृपाळु उदार पंढरीराणा । जाणतसे खुणा अंतरीच्या ॥१॥ तिहीं त्रिभुवनी चाले एक सत्ता । म्हणोनि तत्त्वतां कींव भाकी ॥२॥ करुणाकर तुम्ही भक्तांची जीवन । हें आम्हां वचन श्रुतिवाक्य ॥३॥ एका जनार्दनीं आलोंसें शरण । काया वाचा मन जडलें पायीं ॥४॥