भजनी मालिका
संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर

तेराव्या शतकातील संत-कवी; ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचे कर्ते.

संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर मराठीत ज्ञानेश्वरी ही टीका लिहिली. वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतांमध्ये त्यांचे स्थान अग्रगण्य आहे. आळंदी येथे त्यांची संजीवन समाधी आहे.

या संतांची भजने

लाउनि मनगणीची दोरी विपरीत तयाची कुसरी । अकळून न कळे श्रीहरी । अवघे वोडंबर तुझें ॥१॥ अष्टदळकमळाची वोवरी । विपरीत तयाची कुसरी । एकविस खणांचे उपरी । बाहीजु कां हरी दाखविली ॥ध्रु०॥

वाजतसे बोंब कोण्ही नायकती कानीं । हरि हरि न म्हणती तयांसी थोर जाली हानी ॥१॥ उठा उठा जागा पाठीं भय आलें मोठें । पंढरिवांचुनी दुजा ठाव नाहीं कोठें ॥ध्रु०॥