भजनी मालिका
संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर

तेराव्या शतकातील संत-कवी; ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचे कर्ते.

संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर मराठीत ज्ञानेश्वरी ही टीका लिहिली. वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतांमध्ये त्यांचे स्थान अग्रगण्य आहे. आळंदी येथे त्यांची संजीवन समाधी आहे.

या संतांची भजने

विज्ञानाचे ज्ञान अज्ञानीं घनवट । ज्ञानें अज्ञान नीट लाविलें दिसें ॥१॥ मी तूं हे मात हरपले दृष्टांत । ह्रदयीं ह्रदयस्थ निजतेजें ॥ध्रु०॥

विश्व भुलवी योगमाया तो । गोकुळीं रहिवासु तो गे बाई ॥१॥ वसुदेवकुमरु तो । देवकीनंदनु तो गे बाई ॥ध्रु०॥

वेद प्रमाण करावया गोकुळासि आला । कीं नाटळिचा कुवांसा जाला । ब्रह्म आणि गोवळा । ब्रह्मादिका वंद्यु ऐसा निगमु । पैं लाजविला ॥