भजनी मालिका

भजने

उत्तीर्ण त्यांचे काय व्हावें । न कळे भावें वंदितों ॥१॥ जीव पायीं ठेवूं म्हणे । लटिकेपणें तो मिथ्या ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उत्तीर्ण त्याचें नव्हिजे आतां । जिवही अर्पितां थोडाची ॥१॥ ओंवाळूनि सांडूं काया । वरुनी पायां संतांच्या ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उत्तीर्ण नव्हीजेची वेचतां जीवें । ऐसे बरवे उपकार याचे ॥१॥ सांगावें तें कोठवरी । जे जे अवसरीं जें केलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उदकीं कालवी शेण मलमूत्र । तो होय पवित्र कासयानें ॥१॥ उद्धारासी ठाव नाहीं भाग्यहीना । विन्मुख चरणां संतांचिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उदकीं बुडतां क्षिती तारियेली । भूतें सारियलीं दाढे-वरी ॥१॥ अद्यापि तूं होसी ऐसा ह्लषिकेशी । धरूनि मारिसी बळि-वंत ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उदंड क्षेत्राची पाहिली रचना । पंढरी ते जाणा भुवैकुंठ ॥१॥ तीर्थ आणि देव संतसमागम । ऐसें सर्वोत्तम कोठें नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उदंड तीर्थ महिमा वर्णिला । परी नाहीं भेटला पांडुरंग ॥१॥ पंढरींसारखे तीर्थ महीवरी । न देखों चराचरीं त्रैलोक्यांत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उदंड तीर्थें क्षेत्रें पाहातां दिठीं । नाहीं सृष्टी तारक ॥१॥ स्नानें पावती मुक्ति जगा । ऐशी चंद्रभागा समर्थ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उदंड तीर्थे पृथ्वींच्या ठायीं । ऐसा महिमा नाही कोणें जागीं ॥१॥ तया पुंडलीकें आम्हा सोपें केलें । परब्रह्य्मा उभे ठेलें विटेवरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उदंड नागवले वाहावले पुरीं । ऐसी याची थोरी काय सांगों ॥१॥ ब्रम्हादिक जेणें बहु नागविले । सिद्ध ऋषि भुलविले येणें देख ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

उदंड पाहिले उदंड ऐकिले । उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ॥१॥ एसी चंद्रभागा ऐसे भीमातीर । ऐसा विटे वरी देव कोठे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उदंड भक्त भाग्यवंत देखिले । परी निधान दाविलें पुंडलिकें ॥१॥ धन्य धन्य केला जगाचा उद्धार । नाहीं लहानथोर निवडिले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उदंड मंत्र उदंड तीर्थे । परी पवित्र निर्धार पंढरीये ॥१॥ उदंड महिमा उदंड वर्णिला । परी या विठ्ठलावांचुनी नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उदंड शाहाणे होती तर्कवंत । परि नेणवे अंत विठोबाचा ॥१॥ उदंडा अक्षरां करोत भरोवरी । परि ते नेणेवेची थोरी विठोबाची ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

उदंडाचें धांवणे केलें । तुम्हीं तें ऐकिलें पुराणीं ॥१॥ म्हणोनियां विश्वास झाला । संतींही सांगितला बहुतांपरि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा