भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदंड शाहाणे होती तर्कवंत । परि नेणवे अंत विठोबाचा

udand shahane hoti tarkavant | pari nenave ant vithobacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उदंड शाहाणे होती तर्कवंत । परि नेणवे अंत विठोबाचा ॥१॥ उदंडा अक्षरां करोत भरोवरी । परि ते नेणेवेची थोरी विठोबाची ॥२॥ तुका म्हणे नाहीं भोळेपणा विण । जाणीव ते सिण रितें माप ॥३॥