भजनी मालिका
← भजनांकडे परत

उत्तम स्थळ पंढरी देखा । उभा सखां विठ्ठल

uttam sthal pandhari dekha | ubha sakhan viththal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उत्तम स्थळ पंढरी देखा । उभा सखां विठ्ठल ॥१॥ एकदां जा रे तये ठायीं । प्रेमा उणें मग काई ॥२॥ भाग्य जोडले सर्व हातां । त्रैलोकीं सत्ता होईल ॥३॥ मोक्षामुक्ती तुम्हीपुढें । दास्यत्व घडे तयांसी ॥४॥ एका जनार्दनीं त्याचे भेटी । सुखसंतोषा पडेल मिठी ॥५॥