भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदंड क्षेत्राची पाहिली रचना । पंढरी ते जाणा भुवैकुंठ

udand kshetrachi pahili rachana | pandhari te jana bhuvaikunth

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उदंड क्षेत्राची पाहिली रचना । पंढरी ते जाणा भुवैकुंठ ॥१॥ तीर्थ आणि देव संतसमागम । ऐसें सर्वोत्तम कोठें नाहीं ॥२॥ सागरादि तीर्थ पाहतां पाहिलें । परी मन हें वेधलें पंढरीये ॥३॥ एका जनार्दनीं सुखाची विश्रांती । पाहतां विठ्ठलमुर्ति लाभ बहु ॥४॥